५वी ते ९ वी तील CBSE बोर्डच्या इंग्रजी व SSC बोर्डच्या मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांच्या विविधांगी शैक्षणिक गुणवत्तेला आव्हान देणारी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा असेल.

शालेय विषयांसोबतच विद्यार्थ्यांमध्ये मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगात आणण्याची क्षमता किती प्रमाणात आहे आणि एका विषयामध्ये मिळवलेल्या माहितीचा, ज्ञानाचा दुसरा विषय समजून घेताना तिला/त्याला उपयोग करता येतो का हे समजून घेणे MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट मुळे सहज शक्य होणार आहे. याच बरोबर प्रश्न सोडवत सोडवत अध्ययन (Learning through Assessment) करण्याची संधीसुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यांच्या बुद्धीला चालना देणारे आव्हानात्मक प्रश्न आणि तितकेच नवनवीन प्रश्न प्रकार येथे विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळणार आहेत.

अधिक वाचा