MKCL ऑलिंपियाड Movement – परीक्षा नमुना:

  • संगणक-आधारित परीक्षा:
    • विद्यार्थ्यांना MKCLच्या अधिकृत लर्निंग सेंटरमध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागेल.
    • ही संगणक-आधारित परीक्षा MKCLच्या कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम ऑनलाइन परीक्षा प्रणालीद्वारे वेबकॅमेराच्या माध्यमातून घेतली जाईल.
  • परीक्षा पेपर व प्रश्नांबद्दल माहिती:
    • प्रत्येक इयत्तेसाठी एकच प्रश्नपत्रिका असेल, ज्यामध्ये सर्व विषयांचे प्रश्न असतील.
    • प्रश्नांचे गुण त्यांच्या अवघडपणा व शैक्षणिक उद्दिष्टांनुसार वेगवेगळे असतील.
    • शैक्षणिक उद्दिष्टांमध्ये ज्ञान, समज, उपयोग, विश्लेषण, संकल्पना व मूल्यांकन/निर्णय यांचा समावेश आहे (शिक्षणतज्ज्ञ डॉ. बेंजामिन ब्लूम यांच्या व्याख्येनुसार).
    • प्रश्नपत्रिका विविध गटांमध्ये विभागलेली असेल, प्रत्येक गटात सर्व विषयांचे प्रश्न असतील. उदाहरणार्थ, इयत्ता ५वी ते ७वी साठी प्रत्येक गटात ७ प्रश्न असतील – प्रत्येक विषयासाठी एक. (या स्वरूपामुळे विद्यार्थी विषयांमध्ये स्विच करू शकतात, ज्यातून त्यांची संज्ञानात्मक लवचिकता तपासली जाते)
    • विद्यार्थी एकामागून एक गट सोडवू शकतात.
    • कठीण वाटणारे प्रश्न विद्यार्थ्यांना वगळता येतात व पुढील प्रश्न सोडवता येतात. परीक्षेच्या कालावधीत पुन्हा परत येऊन उरलेले प्रश्न सोडवता येतील.
    • विद्यार्थ्यांनी १ तासाच्या मर्यादित वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा.
    • प्रश्नांची संख्या अमर्यादित आहे. विद्यार्थी जितके प्रश्न सोडवत जातील, तितके अधिक प्रश्न मिळतील, ज्यामुळे गुण मिळवण्याची संधी वाढते. (हे स्वरूप विद्यार्थ्यांची चिकाटी तपासते)
    • विद्यार्थी परीक्षा कधीही संपवू शकतात.
    • १ तासानंतर परीक्षा आपोआप संपेल.
    • पारंपरिक परीक्षांप्रमाणे नसून, या परीक्षेत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संख्येने प्रश्न सादर केले जातील आणि ते सोडवण्याची मुभा असेल.

MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट परीक्षेतील प्रश्न-प्रकार:

  • बहुपर्यायी प्रश्न - एक पर्याय अचूक किंवा अनेक पर्याय अचूक
  • जोड्या / स्तंभ सुसंगती लावणे,
  • गाळलेल्या जागा भरा,
  • प्रतिमा, चित्रे, ध्वनिफिती / चित्रफितींवर आधारित प्रश्न,
  • आकलन,
  • वर्गीकरण,
  • पर्यायांची निवड करून योग्य क्रम लावणे,
  • शब्द कोडी,
  • चित्र कोडी, इ.