MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट परीक्षेचा अभ्यासक्रम:

  • ५वी ते ९वी इयत्तेपर्यंत सर्व विषयांसाठीच्या पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम CBSE बोर्ड (इंग्रजी माध्यम) आणि SSC बोर्ड (मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यम) यांचा समावेश असलेला आहे.
  • व्यक्तिमत्त्व विकास आणि २१व्या शतकातील कौशल्यांव्यतिरिक्त, प्रश्नांमध्ये सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स (शालेय वातावरणातील घटना व या वयोगटातील मुलांच्या भावना यांच्याशी संबंधित) यांचा समावेश असेल.या प्रकारच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांनी कोणतीही विशिष्ट पाठ्यपुस्तकं किंवा इतर पुस्तके वाचणे अपेक्षित नाही.
  • इयत्तेनुसार MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट परीक्षेतील विषयांची संख्या व नावे:

इयत्ता विषयांची संख्या विषयांची नावे
५वी मराठी, इंग्रजी, हिंदी, पर्यावरण विज्ञान १, पर्यावरण विज्ञान २, गणित, व्यक्तिमत्त्व विकास, २१व्या शतकातील कौशल्ये
६वी मराठी, इंग्रजी, हिंदी, इतिहास आणि नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, गणित, व्यक्तिमत्त्व विकास, २१व्या शतकातील कौशल्ये
७वी मराठी, इंग्रजी, हिंदी, इतिहास आणि नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, गणित, व्यक्तिमत्त्व विकास, २१व्या शतकातील कौशल्ये
८वी मराठी, इंग्रजी, हिंदी/संस्कृत, इतिहास आणि नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, गणित, व्यक्तिमत्त्व विकास, २१व्या शतकातील कौशल्ये
९वी मराठी, इंग्रजी, हिंदी/संस्कृत, इतिहास आणि राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित १, गणित २, व्यक्तिमत्त्व विकास, २१व्या शतकातील कौशल्ये

SSC मराठी / सेमी इंग्रजी माध्यमाच्या MKCL ऑलिंपियाड मूव्हमेंट अभ्यासक्रमासाठी येथे क्लिक करा.
SSC इंग्रजी माध्यमाच्या MKCL ऑलिंपियाड मूव्हमेंट अभ्यासक्रमासाठी येथे क्लिक करा.


टीप: हिंदी विषयाची इयत्ता ५ वी, इयत्ता ६वी, आणि इयत्ता ७ वीची परीक्षा धड्यावर आधारित होणार नसून हिंदी विषयाशी निगडीत विविध क्षमतांवर आधारित होईल. यामध्ये शब्दसंग्रह, व्याकरण, भाषांतर यांचा समावेश असेल. त्याचबरोबर दैनंदिन आयुष्याशी निगडीत प्रश्न आणि विविध विषयांशी समवाय साधणाऱ्या प्रश्नांचा समावेश असेल.