नियम आणि अटी
- इयत्ता 5 वी ते 9 वीतील CBSE बोर्ड इंग्रजी माध्यम व SSC बोर्ड मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट च्या स्पर्धा परीक्षेत भाग घेऊ शकतात.
- विद्यार्थ्याने ऑनलाईन परीक्षेसाठी MS-CIT/KLiC केंद्राकडे संपर्क साधावा.
- एक विद्यार्थी जास्तीत जास्त केवळ एक वेळा परीक्षा देऊ शकतो आणि जास्तीत जास्त एका बक्षिसासाठी त्याचा विचार केला जाईल.
- कोणताही विद्यार्थी राज्यस्तरामध्ये विजयी ठरल्यास तो जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाही.
- कोणत्याही श्रेणीमध्ये एक विद्यार्थी जास्तीत जास्त 1 पुरस्कार रक्कम मिळविण्यासाठी पात्र असेल..
- बक्षिसामधून लागू असलेले कर वजा केले जातील.
- MKCL विद्यार्थ्यांची माहिती भविष्यात मार्केटिंगची आणि प्रोमोशन साठी वापरू शकते.
- MKCL कडे ‘MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट’ स्पर्धा परीक्षेशी संबंधित सर्व हक्क राखीव आहेत.
- MKCL ला बक्षिसाची रक्कम, महत्वाच्या तारखा, अटी व शर्ती आणि MKCL ऑलिम्पियाड मुव्हमेंट च्या स्पर्धा परीक्षाशी संबंधित कोणतीही माहिती कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सुधारित करण्याचे अधिकार आहेत.
- MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट स्पर्धा परीक्षेतील कोणत्याही बदलांसाठी MKCL कोणालाही उत्तर देण्यास बंधनकारक ठरणार नाही.
- प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थी फक्त संबंधित इयत्तेची परीक्षा देतात. उदा. इयत्ता 6 वीचा विद्यार्थी फक्त 6 वीची MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट परीक्षा देईल. जर त्याने इतर कोणत्याही इयत्तेची MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट परीक्षा देण्याचा प्रयत्न केला तर अंतिम निकालात त्याच्या गुणांचा विचार करता येणार नाही.
- नोंदणीच्यावेळी विद्यार्थी काळजीपूर्वक भाषा / माध्यम निवडतील. परीक्षेच्या वेळी भाषेचा पर्याय बदलला जाऊ शकत नाही.
- मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमांमधील विद्यार्थ्यांनाशी समान स्तरावर विचारात घेतले जाईल. दोन्ही माध्यमासाठी समान निकष असतील. पुरस्कार प्रती माध्यम घोषित केले जाणार नाहीत.
- MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट परीक्षेचे कार्यक्षेत्र फक्त महाराष्ट्र राज्य आहे.
- MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट परीक्षा देताना विद्यार्थ्यांना कॅमेरा हा अनिवार्य असणार आहे. काही संशयास्पद आढल्यास त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतून बाद करण्याचे सर्व हक्क MKCL कडे राखीव असतील.
* या स्पर्धेच्या अटी व शर्तींमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता बदल/सुधारणा करण्याचे अधिकार MKCL कडे आहेत आणि अशा कोणत्याही प्रकारच्या बदल/सुधारणांसाठी MKCL कोणालाही उत्तर देण्यास बांधील ठरणार नाही.