MKCL MOM शुल्क प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ₹125/- आहे. शुल्क संरचना खालीलप्रमाणे आहे:

तपशील फी (₹)
ALC सेवा शुल्क ₹ ७५/-
MFO (GST सह) ₹ ५०/-


  • परीक्षेसाठी प्रती विद्यार्थी रु. १२५/- एवढे माफक शुल्क आकारण्यात येईल. (ALC शेअर ७५ रुपये आणि MFO ५० रुपये (GST सह))
  • परीक्षेस बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला ERA मधून मिळणारे MKCL चे ई-प्रमाणपत्र ALC तर्फे छापून देण्यात येईल.
  • या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची शाळेच्या प्रथम सत्रांत परीक्षेचीही उत्तम तयारी होईल.

MKCL ऑलिम्पियाड मूव्हमेंट पारितोषिके

  1. जिल्हा विजेत्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येतील:
    जिल्हा / MKCL LLC (Local Lead Centers) पातळीवरील पारितोषिके
    इयत्ता ५ (५वी ते ९वी)
    जिल्हे ३६
    जिल्हावार व इयत्तावार विजेते
    एकूण विजेते आणि पारितोषिके ५८५

    जिल्हा पातळीवरील विजेत्यांना खालील पारितोषिके (शैक्षणिक किटच्या स्वरुपात) देण्यात येतीलः

    जिल्हा स्तर पारितोषिके इयत्ता (५वी ते ९वी) इयत्ता ५वी इयत्ता ६वी इयत्ता ७वी इयत्ता ८वी इयत्ता ९वी
    प्रथम क्रमांक Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit
    द्वितीय क्रमांक Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit
    तृतीय क्रमांक Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit

  1. राज्य पातळीवर खालीलप्रमाणे विजेते घोषित केले जातील:
    राज्य पातळीवरील पारितोषिके
    इयत्ता ५ (५वी ते ९वी)
    इयत्तावार विजेते
    एकूण विजेते आणि पारितोषिके १५

    राज्य पातळीवरील विजेत्यांना (शैक्षणिक किटच्या स्वरुपात) खालील पारितोषिके देण्यात येतील:

    राज्य स्तर पारितोषिके इयत्ता (५वी ते ९वी) इयत्ता ५वी इयत्ता ६वी इयत्ता ७वी इयत्ता ८वी इयत्ता ९वी
    प्रथम क्रमांक Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit
    द्वितीय क्रमांक Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit
    तृतीय क्रमांक Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit Academic Kit


    MOM परीक्षेच्या निकालांची व पारितोषिक विजेत्यांच्या नावांची घोषणाः या दोन्हीही बाबी mom.mkcl.org या वेबसाईटवर १० डिसेंबर २०२५ पर्यंत जाहीर करण्यात येतील.

  • राज्यपातळीवर विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे जिल्हा पातळीवर पुन्हा विचारात घेतली जाणार नाहीत. तसेच जिल्हा स्तरीय विजेत्यांची नावे राज्य पातळीवर परत घेतली जाणार नाहीत.
  • पारितोषिकाचे शुल्क सर्व करांसहित आहे.
  • एक विद्यार्थी फक्त एका पारितोषिकासाठी पात्र ठरेल.
  • सर्व माध्यमांची एकत्रित गुणवत्ता यादी बनवण्यात येईल व त्यातून विजेत्यांची घोषणा करण्यात येईल.
  • एज्युकेशन किटच्या स्वरूपात हा पुरस्कार ALC मार्फत दिला जाईल.
  • MKCL ऑलिंपियाड मूव्हमेंट परीक्षेचे निकाल आणि बक्षीस विजेत्यांची नावे या वेबसाइटवर जाहीर केली जातील.


विजेते निवडण्याचे निकष :

  • राज्य व जिल्हा स्तरीय विजेत्यांची निवड त्यांनी मिळवलेले गुण, सोडवलेले प्रश्न, विषयावार सोडवलेले बरोबर प्रश्न, काठीन्यता पातळीनुसार सोडवलेले प्रश्न, उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे कमीत कमी गुण या सर्व निकषांच्या आधारावर होईल.
  • जिल्हा आणि राज्य पातळीवरील विजेत्यांच्या निवडीसाठी किमान 50 आणि त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल.
  • सर्व पातळींवर समान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने होईल.